पहलगाम हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटनाला मोठा धक्का बसलाय.काश्मीरमध्ये रस्ते रिकामे आणि सर्वत्र शांतता पसरली. दुकाने उघडली तरी दुकानांवर तुरळक गर्दी पहायला मिळतेयं. गर्दीने गजबजलेले बाजार सध्या ओस पडलेत.पर्यटनातून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना मोठा फटका बसलाय.लहान दुकानदार, हॉटेल मालक, रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे उत्पन्न पूर्णपणे थांबलेत.त्यामुळे लहान-मोठे उद्योजक आता परिस्थिती सुरळीत होण्याच्या आशेने वाट पहात आहेत.