Pahalgam Terror Attack|पाकिस्तानची सर्व बाजूंनी मुस्कटदाबी, बागलीहार धरणाचं पाणी अडवण्याचा निर्णय

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्यासाठी सर्व बाजूंनी मुस्कटदाबी सुरू केली.सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर आता त्यापुढे जाऊन चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार धरणाचं पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आला.हा पाकिस्तानसाठी आणखी एक धक्का असल्याचं सांगितलं जातंय.जम्मू-कश्मीरमधील बागलीहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला.दरम्यान, झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पासंदर्भातही भारत लवकरच कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. #pahalgam

संबंधित व्हिडीओ