भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या संबंध ताणलेले असताना, आता इराणने दोन्ही देशात मध्यस्थी करण्यासाठी पावलं उचलली आहेत.इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराजची भारत आणि पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहेत. आज अराजची हे इस्लामाबादमध्ये जाऊन पाकच्या नेत्यांशी बैठक घेतील.तर 7 आणि 8 मे रोजी इराणचे पराराष्ट्रमंत्री भारतात येणार आहेत.वेळी दिल्लीत येऊन एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.तसंच भारत आणि इराण यांच्यात झालेल्या करारांबद्दलही या बैठकीत चर्चा होईल.