पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सूचक विधान केलंय.'देशातल्या लोकांना जे हवंय ते नक्कीच होईल'असं म्हणत संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला.आपल्या देशाकडे जो वाकड्या नजरेनं बघेल त्यांना सडेतोड उत्तर देणे ही माझी जबाबदारी आहे.ती मी पूर्ण करणार आहे.असं आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिलंय.