अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक धक्का दिला आहे. जो कोणता देश इराणकडून तेल किंवा पेट्रोकेमिकल खरेदी करेल त्याच्यावर निर्बंध लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा चीनला बसणार असून भारतावरही त्याचा परिणाम होणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याचं दिसतंय.