हुती बंडखोरांनी इस्त्रायलवर मोठा हल्ला केलाय.. हुती बंडखोरांकडून इस्त्रायलच्या मुख्य विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला.. यात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय.. बेन गुरियन विमानतळावर क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला.. त्यानंतर दिल्लीहून तेल अवीवला जाणारं एअर इंडियाचं विमान वळवण्याचा निर्णय भारताने घेतलाय.. एअर इंडियाचं विमान अर्ध्यातून परत येणार आहे.. दरम्यान भारतातून तेलअवीवला जाणारी सर्व उड्डाणं 6 मेपर्यंत रद्द करण्यात आलीये..