Kulgam मध्ये रहस्यमय परिस्थितीत सापडला 22 वर्षीय युवकाचा मृतदेह, काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

कुलगाममध्ये रहस्यमय परिस्थितीत 22 वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला.इम्तियाज अहमद मग्रे या युवकाचा मृतदेह 4 मे 2025 रोजी आढळून आला.मिळालेल्या माहितीनुसार, मग्रे हा दहशतवादी गटांसाठी ओव्हर ग्राउंड वर्कर म्हणून काम करत असल्याचा संशय होता. त्याने काही दहशतवाद्यांना मदत केल्याचं पोलिसांकडे कबूल केलं होतं आणि सुरक्षा दलांना एका लपलेल्या अड्ड्याविषयी माहिती देण्यास तो तयार होता. या पार्श्वभूमीवर पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त मोहिमेदरम्यान मग्रेने नाल्यात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाल्यातून वाहून जाताना मग्रेचा मृत्यू झाला.. की त्याला दहशतवाद्यांनीच ठार केलं... हे अद्याप कळू शकलेलं नाहीए... मात्र, पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला आणि त्याचा मृतदेह काही वेळानंतर स्थानिकांनी शोधून काढला. शवविच्छेदनासाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेमागील परिस्थिती अत्यंत रहस्यमय असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ