Palghar|पालकमंत्र्यांच्या जनता दरबारच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांचा आमदार आपल्या दारी कार्यक्रम

पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून आमदार आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला.आमदार राजेंद्र गावित आणि विलास तरे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.यावेळी दोन्ही आमदारांकडे तक्रारींचा पाऊस पडला.शेकडो नागरिकांनी आमदारांकडे आपल्या तक्रारींचा सूर ओढला.त्यामुळे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.नाईक यांनी पालघरमध्ये जनता दरबार घेत 80 टक्के तक्रारींचा निपटारा केल्याचा दावा केला होता.तो दावा आता फोल होता की काय असा प्रश्न उपस्थित राहतोय.

संबंधित व्हिडीओ