मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे गटाने आज परभणीत आक्रमक भूमिका घेतली. मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि रखडलेल्या विकासकामांना गती द्यावी, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात आले. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून शासनाचे लक्ष शेतकरी आणि मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Parbhani news Declare Marathwada drought-hit: Thackeray faction takes an aggressive stance; public protest held outside the District Collector's office.