जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचे संकट कायम असून इंधन पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांसह शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. पेट्रोल पंपांवर टँकर येण्याच्या अपेक्षेने सकाळपासूनच वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे खरीप हंगामाची तयारी सुरू असताना डिझेल अभावी शेतीची कामे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांना पंपावर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून इंधन संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.