Malegaon महापालिकेत उपमहापौरांच्या दालनात झळकला Tipu Sultan चा फोटो, पुन्हा नव्या वादाला सुरुवात?

मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा लागला टिपू सुलतान यांचा फोटो.उपमहापौर शान ए हिंद यांच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो झळकला.छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो.कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. टिपू सुलतान यांच्या फोटोवरून मालेगावात उठले होते यापूर्वी वादंग. पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता? टिपू सुलतान याने देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा उपमहापौर शान - ए - हिंद यांचा पुनरुच्चार. उपमहापौर शान ए हिंद यांनी नूतनीकरण केलेल्या दालनात आज केला प्रवेश. Tipu Sultan image displayed in the Deputy Mayor's office at Malegaon Municipal Corporation; new controversy #MalegaonmunicipalCorporation #tipusultan #NDTVMarathi

संबंधित व्हिडीओ