पुण्यातील मांजरी बुद्रुक येथे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाला तेरावा दिवस असून विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. दरम्यान या आंदोलनातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.. दरम्यान या आंदोलनाकडे आदिवासी विकासमंत्री लक्ष देणार का ? विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक दृष्टीने तोडगा काढला जाणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
A to Z updates on the tribal students' protest on NDTV Marathi.
#tribalstudentsprotest #PuneNews #ndtvmarathi