Nashik| Lasalgaon ची विशेष कांदा Express रखडली?, दिवसभरात फक्त 50 गोण्यांचीच लोडिंग

नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकावरून आज दिल्लीकडे रवाना होणाऱ्या विशेष ‘कांदा एक्सप्रेस’च्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एनसीसीएफच्या बफर स्टॉकमधील ८४० टन कांदा २१ बोग्यांमधून दिल्लीला पाठवण्याचं नियोजन होतं. मात्र काल रात्रीपासून रेल्वे स्थानकावर रॅक उभा असतानाही दिवसभरात केवळ एका ट्रकमधून ५० गोण्या कांद्याचीच लोडिंग करण्यात आली. त्यानंतर कांद्याचा मालच स्थानकावर पोहोचला नसल्याने आज रेल्वे दिल्लीकडे रवाना होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे विशेष कांदा एक्सप्रेस नेमकी कधी निघणार, अखेर किती कांदा दिल्लीला पाठवला जाणार आणि नियोजन कुठं चुकलं, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. Lasalgaon's special 'Onion Express' stalled? Only 50 sacks loaded throughout the day #Lasalgaon #onine #NDTVMarathi

संबंधित व्हिडीओ