Pimpri Chinchwad चे महापौर रवी लांडगेंना धमकी, पोलिसांच्या हेल्पलाईनवर कॉल करुन जीवे मारण्याची धमकी

पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. पिंपरी चिंचवड पोलीसांच्या समाधान हेल्पलाईन वर कॉल करुन महापौरांना धमकवण्यात आलं.आशिष जमदाडे-पाटील नावाच्या व्यक्तीनं हा फोन केला होता. ही व्यक्ती महापौरांना काही महिन्यांपूर्वी दोन वेळा भेटली होती. क्रीडा संबंधित काही काम घेऊन त्यांनी महापौरांची भेट घेतली होती. त्यानंतर आत्ता थेट जीवे मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ उडाली. भोसरी पोलिसांनी आशिष जमदाडेना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते मानसिक तणावात असल्याचं दिसून आलं. त्यामुळं समज देऊन त्यांना सोडण्यात आलं, अशी माहिती महापौरांनी दिली.

संबंधित व्हिडीओ