धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.मुलांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्यात. पिंपरी जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार समोर आलाय. वाटपापुर्वीच चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्याचं समोर आलं. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना हे चॉकलेट दिले जातात. ज्वारी, बाजरी पासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बारमध्ये अळ्या आढळल्यात.