पुणे पोर्श कार अपघात प्रकरण अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल हिला जामीन मंजूर झालाय.मात्र अटी-शर्थींसह तिचा जामीन मंजूर करण्यात आलाय. शिवानी अगरवालला दर बुधवारी 11 ते 1 या वेळेत येरवडा पोलीस ठाण्यात हजर रहाणे बंधनकारक असणारेय. तसंच शिवानी अगरवालला स्वतःच्या मोबाईलच लोकेशन सतत सुरू ठेवणे देखील बंधनकारक असणारेय.पोलिसांनी शिवानी अगरवालचा पासपोर्ट देखील जप्त केला असल्याची माहिती समोर येतेय.