Pune Rain Updates| अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस; रस्त्यावर पाणीच पाणी, पुणेकरांची तारांबळ

पुणे शहरातील अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावलीय...पण याच पावसात पुणेकरांची तारांबळ उडाली.. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलंय.. कोंढवा, हडपसर, लष्कर, येरवडा, विमाननगर, शिवाजीनगर परिसरात जोरदार पाऊस झालाय. तसंच एरंडवणे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि शुक्रवार पेठ भागातही मुसळधार सरी कोसळल्यात. स्वारगेट, पद्मावती, धनकवडी, कात्रज आणि सिंहगड रस्ता परिसरात पावसाचा जोर कायम असून वडगाव धायरी, कोथरूड, कर्वेनगर, पाषाण, गणेशखिंड भागातही पावसाने दमदार हजेरी लावलीय. एकूणच दिवसभराच्या उकाड्यानंतर पुणेकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय. विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला. काही भागांत झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्यात. तर मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक संथ झालीय.

संबंधित व्हिडीओ