Pune Rain| पुणेकरांना अखेर दिलासा; शिवाजीनगर, येरवडा, औंध परिसरा पावसाला सुरूवात | NDTV मराठी

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरासह येरवडा, औंध, मध्यवर्ती पेठा आणि अनेक उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पावसामुळे शहराच्या वातावरणात सुखद बदल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ