#AjitPawar #NCP #PunePolitics #RupaliChakankar #RupaliThombare राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे शहर बैठक अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील समोरासमोर आल्या. अजित पवारांनी पक्षाच्या प्रवक्त्यांची सक्त कानउघाडणी केली. प्रवक्त्यांनी आपली भूमिका नीट मांडावी, पक्षाची बदनामी खपवून घेणार नाही, अशी ताकीद त्यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांचे नाव न घेता दिली. तसेच, प्रत्येक घडामोडींवर माझे लक्ष आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले.