Pune| BJP ला मतदान करण्यासाठी फोन? Supriya Sule यांचा आरोप, सुळेंकडून संबंधित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर शाखेतून भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधित ऑडिओ क्लिप त्यांच्या एक्स हँडल वरती पोस्ट केली आहे आणि हे प्रकरण अतिशय गंभीर आणि आक्षेपार्ह असल्याचे म्हटल आहे.संबंधित ऑडिओ क्लिप मध्ये सणसर येथील मतदान केंद्रांवर ज्या मतदारांची नावे आहेत अशा मतदारांना बँक कर्मचाऱ्यांकडून फोन केले जात असून भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. सुप्रिया सुळेंनी ही ऑडिओ क्लीप व्हायरल केलीय. Pune | Calls urging people to vote for the BJP? Supriya Sule makes an allegation; shares a recording of one such call.

संबंधित व्हिडीओ