Sanjay Gandhi राष्ट्रीय उद्यानात शिकारीचा थरार,एकाचा मृत्यू, 2 जखमी; शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बेकायदा प्रवेश करून रानडुकराची शिकार करण्यासाठी गेलेल्या पथकातील एका व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन न करता आणि पोलिसांना माहिती न देता पहाटेच अंत्यसंस्कार करण्यात आलाय.. मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे दर्शविणारे कथित खोटे प्रमाणपत्र दिल्याच्या संशयावरून संबंधित डॉक्टरसह सहा जणांवर काशीगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय उद्यानातील बेकायदा शिकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय..

संबंधित व्हिडीओ