Pune| हुंड्यासाठी 5 लाखांची मागणी,गर्भवती वैष्णवी जरांडेनं संपवलं जीवन; पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा

उंड्री परिसरातील वडाचीवाडीतक 23 वर्षीय गर्भवती महिलेनं आपलं जीवन संपवलं आहे. पाच लाख रुपयांची मागणी करीत पतीसह सासू-सासऱ्यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी जरांडेनं जीवन संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. हुंड्यासाठी पाच लाख रुपये किंवा कार घेऊन देण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केलीय होती. यावरून 24 तारखेला वैष्णवीच्या पतीनं वाद घातला.. त्यानं तिच्या आईला फोन करून मुलीला परत घेऊन जाण्यास सांगितलं. वैष्णवीच्या तक्रारीनंतर पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ