मिरजेतील इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमच्या इंधन डेपोतून सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांना पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जातो. मात्र, मुंबईहून होणाऱ्या इंधन पुरवठ्यात घट झाल्याने मिरजमधील साठ्यावर ताण निर्माण झाला असून डेपोबाहेर टँकरच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे पंपावर पेट्रोल आणि डिझेलची कमतरता भासू लागली आहे... मिरज रेल्वे स्थानकाजवळील इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम डेपोतून दररोज मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा केला जातो. इंडियन ऑइल डेपोतून दररोज सुमारे १२५ टँकर, तर भारत पेट्रोलियम डेपोतून सुमारे १५० टँकरद्वारे सरासरी चार लाख लिटर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होतो. दोन्ही डेपोत सुमारे चार कोटी लिटर इंधन साठवणुकीची क्षमता आहे. मुंबईहून रेल्वे वेंगनद्वारे इंधन आणले जाते. आणि चार जिल्ह्याला वाटप केले जाते.. तर यावेळी इंडियन ऑईल डेपोतील कोणताही अधिकारी कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाही. मात्र जिल्हा प्रशासनाकडून इंधन ऑइल ची कोणतीही टंचाई नसल्याचं सांगण्यात आलाय.