पुण्याच्या चाकणमध्ये अॅमेझॉन कंपनीच्या गोडाऊनवर भारतीय मानक ब्युरोने छापा टाकला.यात तब्बल अडीच हजार उत्पादनांवर कारवाई केलीय. यात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणासह लहान मुलांच्या घातक खेळणींचाही समावेश आहे.या कारवाईमुळे ऑनलाईन खरेदीच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उभे राहिलेत.पुण्याच्या भारतीय मानक ब्युरोचे पुणे शाखा कार्यालयाचे संचालक सुरेंद्र राणे यांनी याविषयीची माहिती दिलीय.