हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासून पडत असलेल्या रिमझिम पावसाने दुपारपासून जोर धरला आहे.तर हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी यावर्षी पहिल्यांदाच दुधडी भरून वाहत आहे. तर या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळालं आहे.तर हिंगोली जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.आपत्ती व्यवस्थापनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..