मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतलाय. राज्याच्या इतिहासात प्रथमच दुष्काळग्रस्त शेतकर्यांना 5000 रुपये अग्रीम मदत दिली जाणार आहे.. यात सुमारे एक ते सव्वा कोटी शेतकर्यांना थेट खात्यात पैसे मिळणार आहे.. ही अग्रीम मदत सुमारे 6 हजार कोटी रुपयांची असणार आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्याना इशाराही दिलाय. आचारसंहितेचं कारण देत कुणी अधिकारी येत नसतील तर कारवाई करू असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला. राज्य सरकारने दुष्काळग्रस्तंना जाहीर केलेली मदत तुटपुंजी आणि शेतकऱ्यांची चेष्टा करणारी... अशी टीका माजी खासदार राजू शेट्टींनी केलीय.
The aid announced by the government for farmers is meager and mocks them – Raju Shetti | Drought