रत्नागिरी जिल्ह्यात सध्या शेत नांगरणी स्पर्धांचा उत्साह पाहायला मिळतोय.संगमेश्वर तालुक्यातील वाडावेसराड पावसकरवाडी येथील बळीराजा शेतकरी मंडळाकडून सामूहिक नांगरणी व भातलावणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 100 हुन अधिक बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.शेतकऱ्यांना शेती व्यवसायाकडे वळवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन म्हणून या शेत नांगरणी स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..