सरकारने दुष्काळाबाबत काढलेल्या GR विरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन छेडले. हा GR केवळ शेतकऱ्यांचा रोष शांत करण्यासाठी असून त्यातून शेतकऱ्यांना कोणतीही ठोस मदत मिळणार नसल्याचा आरोप तुपकर यांनी केला.तसेच राज्यातील एकाही मंत्र्याला निर्णयावर सही करण्याचा अधिकार नसल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी 30 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली आहे. याबाबत रविकांत तुपकरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी.
Drought-related Government Resolution misleads farmers; Ravikant Tupkar stages protest in Buldhana.