SIT चौकशीला तयार पण बदनामी नको, 2025 MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे CM Fadnavis यांना आवाहन

राज्यात पेपरफुटीच्या आरोपांवरून वातावरण तापलेले असतानाच 2025 मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाचे आवाहन केले आहे. प्रामाणिकपणे परीक्षा देऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये आणि आमची SIT चौकशी करा, आम्ही कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार आहोत, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे. परीक्षा रद्द व्हावी यासाठी सोशल मीडियावर जाणूनबुजून बदनामी मोहीम राबवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या बदनामीमुळे मानसिक तणाव वाढून रात्रभर झोप येत नसल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. बदनामी करणाऱ्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.

संबंधित व्हिडीओ