परतीच्या पावसाने मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये थैमान घातले आहे. या पावसामुळे शेतीत उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक भागात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.