Santosh Deshumkh हत्या प्रकरणात आज सुनावणी, गेल्या सुनावणीवेळी कोर्टात काय झालं? | NDTV मराठी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी ११ वाजता तिसरी सुनावणी होणार आहे.आरोपींवर चार्ज फ्रेम करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहून न्यायालयाकडे विनंती अर्ज दाखल करणार करणार आहेत.सरपंच देशमुख हत्याप्रकरणात 1400 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब, ऑडिओ व्हिडिओ पुरावे देखील दाखल करण्यात आले आहे.सोबतच सीडीआर हा महत्त्वाचा पुरावा देखील दोषारोपपत्रसोबत जोडण्यात आले आहे. गेल्यावेळी कराडच्या वतीने वकील विकास खाडे यांनी बाजू मांडताना या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांची कागदपत्र आम्हाला मिळाली नसल्याचा दावा केला होता.त्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना कागदपत्र देण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ