आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात ३५ कोटी खर्च करून तब्बल १०० शववाहिका खरेदी करण्यात आल्या. जानेवारीमध्येच त्या आल्या, पण तीन महिन्यांहून अधिक काळ पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयाजवळ मोकळ्या जागेत उभ्या आहेत. काहींच्या चाकातील हवा गेली आहे, तर काहींच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या आहेत!