Nashik विधान परिषदेत Shivsena चं टेन्शन कायम; गोकुळ गीतेंची माघार, पण दराडेंना जाहीर पाठींबा नाही

महायुतीमधील बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मध्यस्थीला अखेर यश आलंय.महायुतीसमोर मोठं आव्हान उभं करणारे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतलाय.मात्र दुसरीकडे गोकूळ गीतेची नाराजी कायम असल्याचं दिसतंय. गोकूळ गीतेंनी माघार घेतली असली, तरी नरेंद्र दराडेंना पाठिंबा दिला नाहीये.पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मी फक्त आपला प्रचार थांबवतोय, पण आपला कुणालाही पाठिंबा नसेल, असं गोकूळ गीते म्हणालेत.यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला गोकुळ गीतेंची नाराजी दूर करण्यात यश काही आलेलं नाही... नाशिक विधान परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेसमोर चिंतेचा डोंगर अजूनही कायम आहे.

संबंधित व्हिडीओ