Sindhudurg| आंबा-काजू उत्पादकांना नुकसान भरपाई; अपुऱ्या मदतीमुळे बागायतदार नाराज,याचाच घेतलेला आढावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या पिकांच्या नुकसानीपोटी सरकारकडून भरपाई वितरणाची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. नव्याने आणखी ९५३ आंबा आणि काजू बागायतदारांच्या थेट बँक खात्यावर १ कोटी ३५ लाख हजार ५० रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत नुकसान भरपाई मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची एकूण संख्या २९ हजार ३०८ वर पोहोचली आहे. मात्र, भरपाईचे आकडे मोठे दिसत असले, तरी प्रत्यक्ष बागायतदारांच्या हाती पडलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप आता आंबा बागायतदारांकडून केला जातोय. "भीक नको पण कुत्रा आवर" अशीच काहीशी उद्विग्न प्रतिक्रिया स्थानिक बागायतदारांमधून उमटत आहे. प्रत्यक्षात बागायतदारांचे झालेले नुकसान आणि मिळालेली मदत यात मोठी तफावत असल्याने शेतकरी तीव्र नाराज आहेत. ​याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे वेंगुर्ल्याचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी

संबंधित व्हिडीओ