नेहमीच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला जातो.मात्र, एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार या महिन्यात फक्त 56% झालेला आहे.निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतका कमी झालेला आहे.. एसटी कामगार संघटनांनी मात्र यावर टीका केलीय.. आधीच अपुरा पगार आणि त्यात जर फक्त 56% पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी सरकारला विचारलाय.. तसेच सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ही त्यांनी केली.