मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार आहे.. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत या मोर्चाच्या मार्गाची घोषणा करण्यात आलीय. 4 ऑक्टोबरला मुंबईमध्ये विराट मोर्चा निघणार असून या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. भायखळा वरून हा मोर्चा निघेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथे व्यासपीठ तिथे बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय. या मोर्चाचं सगळ्या नेत्यांना फोनवरून निमंत्रण देणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलंय. या मोर्चात कोणत्याही पक्षाचे झेंडे न आणता फक्त तिरंगा आणण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी केलीय. दरम्यान उद्धव ठाकरेंनी 2 तारखेला होणाऱ्या सीजेपीच्या मोर्चाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय.
Thackeray Brothers | Thackeray brothers' march from Byculla to the Mumbai Municipal Corporation in Mumbai on October 4 | NDTV