यंदाच्या पावसाळ्याने आधीच शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. अनेक भागांत पाऊस कमी, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच आता सप्टेंबर महिनाही कोरडा जाईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तावलाय.तसं झाल्यास खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहेच. पण रब्बी हंगामही धोक्यात येऊन पाणीटंचाईच्या संकटालाही तोंड द्यावं लागणार आहे. याच धोक्याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट.