सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय.18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात असून उद्या मतमोजणी होणारेय.सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 8 पासून सुरूवात झाली.यात सहकारी संस्था 11, ग्रामपंचायत चार, व्यापारी दोन आणि हमाल तोलार गटात एक जागा असणारेय.या निवडणुकीत श्री सिद्धेश्वर विकास पॅनल आणि श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनल मध्ये थेट लढत असणारे.भाजपा आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलची प्रतिष्ठा पणाला लागली.