युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. आणि या दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वाचे समझौते करण्यात आले. कीर-मोदी यांच्या या भेटी द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली. विशेषतः व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञानासंदर्भात काही महत्त्वाचे करार झालेत. खऱं म्हणजे जुलैमध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंग्लंड दौऱ्यावर गेले होते. भारत इंग्लंड यांच्यात द्वीपक्षीय मुक्त व्यापार करारावर त्यावेळीच शिक्कामोर्तब झालं होता. आणि आता कीर यांचा हा छोटेखानी भारतदौरा पार पडलाय. पाहूया कीर यांच्या या भारत भेटीतून भारताच्या खिशात काय आलं आणि इंग्लंडच्या पदरी काय पडलंय.