साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याबाबत माहिती देताना, "आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या दोन्ही आरोपी आणि मृत डॉक्टरमध्ये संबंध होते. याचे डिजिटल पुरावे आम्हाला तपासामध्ये आढळून आले आहेत," असा महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. या प्रकरणी प्राथमिक तपासात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून, पोलिसांविरोधात डॉक्टरची आणि डॉक्टरविरोधात पोलिसांचीही तक्रार होती. दोन्ही बाजूंनी चौकशी पूर्ण झाल्यावर ऑगस्ट महिन्यात हा विषय संपुष्टात आणला गेला होता, त्यानंतर **'फिट सर्टिफिकेट'**बाबत डॉक्टरकडून कोणतीही तक्रार आलेली नव्हती, असेही दोशी यांनी स्पष्ट केले.