Sharad Pawar | MVA | अहिल्यानगर निवडणुकीसाठी रणनिती! शरद पवारांच्या बैठकीला बाळासाहेब थोरात उपस्थित

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील आगामी निवडणुकीच्या रणनितीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवारांच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडी (MVA) म्हणून एकत्रित सामोरे जावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख भूमिका आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत.

संबंधित व्हिडीओ