बंगालच्या उपसागरात 'मोंथा' चक्रीवादळ तीव्र झाले आहे. हे वादळ मंगळवारी (२८ ऑक्टोबर) संध्याकाळी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला काकीनाडाजवळ धडकण्याची शक्यता आहे. किनारी भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशा सरकारने आपत्कालीन तयारी केली आहे. नागरिकांनी आणि मच्छिमारांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान तज्ज्ञ मकरंद कुलकर्णी यांनी केले आहे.