Chh.Sambhajinagar| घनकचरा संकलनासाठी 551 नव्या वाहनांची भर; 100 इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी… शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेच्या ताफ्यात तब्बल ५५१ नव्या वाहनांची भर पडली आहे.यामध्ये १०० इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश असून त्यामुळे शहरातील कचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान होणार आहे..या उपक्रमामुळे शहरातील कचरा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून, स्वच्छ आणि सुंदर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे.

संबंधित व्हिडीओ