सोलापुरात पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या नेत्यांच्या स्टंटबाजीचाही महापूर आलाय.एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून मदतीचा केवळ देखावा करतायत का?.. असा सवाल उपस्थित होतोय.एक छोटा टेम्पो भरून आणलेल्या साहित्यातील केवळ 2 चादरी पूरग्रस्तांना वाटप केल्यात, असा आरोप गावकऱ्यांनी केलाय.उत्तर सोलापुरातल्या तिऱ्हे गावातील गावकऱ्यांनी जलील यांच्यावर आरोप केलेत.जलील यांनी केवळ फोटो काढले, दोन चादरी दिल्या आणि ते रवाना झाले.असं गावकऱ्यांनी म्हटलंय.. नेतेमंडळींकडून फोटोपुरतं मदत कार्य सुरू आहे का?... पूरग्रस्तांची थट्टा चाववली आहे का?... असे सवाल यांतून उपस्थित होतायतय..