यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईनच घ्या, असं म्हणत भाजपनं ठाकरे गटाला डिवचल्यावर ठाकरेंची शिवसेना तर जोरात कामाला लागलीय.....पाऊस असो, वादळ असो किंवा वारा असो.... कुठल्याही परिस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा निश्चय ठाकरे गटानं केलाय... त्याचवेळी शिंदे गटाच्या मेळाव्यासह राज्यातल्या इतर राजकीय दसरा मेळाव्यांवरही पावसाचं सावट आहे.... त्यामुळे दसरा मेळाव्याबद्दल ठाकरे, शिंदे, मुंडे, जरांगे आणि संघ यांचं काय ठरलंय.... पाहुया एक सविस्तर रिपोर्ट....