धाराशिवच्या परांडा तालुक्यातील पिठापुरी येथील खरात वस्ती अजूनही पाण्यातच आहे.सीना नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांचे इतरत्र स्थलांतर केलं. तर अनेक ठिकाणी घरातील अन्नधान्य वाहून रस्त्यावर आलं.शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य देखील पाण्यामुळे भिजलंय, खराब झालंय.घरातील पाणी काढण्यासाठीच नागरिकांचा खटाटोप सुरू आहे..