जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाचा उजवा कालवा फुटण्याचा धोका आता टळलाय.2 दिवसाच्या अतिवृष्टीमुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने उजव्या कालव्यावर दबाव निर्माण झाला होता.मोठ्या विसर्गाने उजव्या कालव्यावर निर्माण झालेल्या दबावामुळे उजव्या कालव्याची भिंत फुटण्याची भीती व्यक्त केली जात होती.मात्र मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने संभाव्य धोका टळला. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..