राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या एका पाहुण्याबद्दल सध्या जोरदार चर्चा आहे.... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचा मुख्य कार्यक्रम २ ऑक्टोबरला नागपुरात होणार आहे.... मात्र त्यानंतर अमरावतीत ५ ऑक्टोबरलाही संघानं एक कार्यक्रम आयोजित केलाय.... या कार्यक्रमासाठी RSSनं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आणि ज्येष्ठ समाजसेविका कमलताई गवई यांना निमंत्रण दिलंय... कमलताईंनी हे निमंत्रण स्वीकारलं की नाकारलं, यावरुन बरेच वाद रंगले.... त्याची पत्रंही सोशल मीडियावर व्हायरल झाली.... मात्र संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल कमलताईंनी नेमकं काय ठरवलंय..... तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या रिपोर्टमधून.....