Mumbai मध्येही साकारणार Dubai सारखा आलिशान मरिना; 424 आलिशान यॉट्स करता येणार पार्क

मुंबईकरांनो आता दुबईसारखाच आलिशान मरिना मुंबईत साकारला जाणार आहे. मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉक आणि क्रॉस आयलंड परिसरात आलिशान बोटी उभ्या करण्यासाठी धक्का उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी तब्बल 424 यॉट्स उभी करण्याची क्षमता असेल. एल अँड टी कंपनीने यासाठी सर्वात कमी किमतीची निविवा दाखल केलीय. या प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी मिळताच कामाला सुरुवात होईल.. मुंबई पोर्ट ऑथॉरिटीकडून 45 हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. पर्यटकांच्या राहण्यासाठी तसंच मनोरंजनासाठी केंद्र उभारली जातील. मुंबईत सध्या यॉट पार्किंगची सुविधा नाही. त्या पार्श्वभूमीवर मरिना विकसित केला जाणार आहे. यातून मुंबई आणि आसपासच्या परिसरातल्या जलपर्यटनाला चालना मिळणार आहे.

संबंधित व्हिडीओ