मुंबईवरुन पुण्याचा प्रवास आता फक्त 48 मिनिटांमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई-पुणे आणि पुणे हैद्राबादसह 7 बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजुरी दिली. मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरचं काम पुढच्या वर्षी सुरु होईल. सध्या मुंबईवरुन पु्ण्याला जायला साडे तीन तासांहून जास्त काळ लागतो. हा प्रवास 48 मिनिटांत पूर्ण होईल. तर पुणे ते हैद्राबाद कॉरिडॉरमुळे 500 किमीचा प्रवास फक्त 2 तास 8 मिनिटांमध्ये शक्य होईल. नवीन कॉरिडॉरची एकूण लांबी 4000 किमी असेल तर यासाठी एकूण 16 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचा अंदाज आहे.